जळगांव, दि. 1 :- राज्यात सर्वत्र दुष्काळाची
भीषण परिस्थिती असून भविष्य काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर उपाय योजना
म्हणून जलसंधारणाच्या कामांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या
शेतातील पाणी शेतामध्येच अडवून तेथेच जिरविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषि,
जलसंधारण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
आत्मा योजनेतंर्गत उत्कृष्ट काम करणा-या जिल्हयातील शेतक-यांचा सत्कार
समारंभ प्रसंगी ना. देवकर बोलत होते.
यावेळी आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश
खोडपे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मीक
पाटील, अशासकीय सदस्य उत्तमराव पाटील, शरद पाटील, सुदाम पाटील जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी किसन मुळे, आत्माचे प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर आदिसह सर्व सत्कारमूर्ती
शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कृषि राज्यमंत्री देवकर म्हणाले शेतक-यांनी शेतामध्ये पाणी
अडविल्यास परिसरातील भूजल पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी पाणी आडवा,
पाणी जिरवा योजने सहभागी व्हावे तसेच हिवरेबाजार गावातील जलसंधारणच्या कामाचा
सर्वांनी आदर्श समोर ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी
शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिलेली असून मागील वर्षी राज्य शासनाने 2
हजार कोटीची मदत शेतक-यांना केली होती. मागील महिन्यात रावेर, यावल भागात
गारपीठीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना लवकर मिळावी म्हणून प्रयत्न केले
जात असलचे ना. देवकर यांनी सांगितले.
तसेच जिल्हयातील शेतक-यांना फळ पिक विमा योजने
महत्व समजले असून सदरच्या विमा योजनेतून केळी पिकाला वर्षभर विमा संरक्षण
मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यात यश मिळेल असे त्यांनी सांगितले. शेतकरी
वर्गाने सेंद्रीय खताचा वापर पिक उत्पादनात घ्यावा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी
करण्याची सूचना ना. देवर यांनी केली. त्याप्रमाणेच शेतकरी प्रयोगशील आहेत. परंतू
कृषि विदयापीठेत शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत असल्याचे त्यांनी
सांगितले. त्यामुळे कृषि शास्त्रज्ञ व अधिकारी वर्ग शेतक-यचांच्या बांधापर्यत पोहोचणे
आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मा कार्यक्रम शेतीच्या विस्तार कामांना
सहाय्य म्हणून महत्वाचा असून सदरच्या यंत्रणेला स्वतंत्र अधिकारी / कर्मचारी वर्ग
देऊन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे ना. देवकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राजूरकर, आमदार
चिमणराव पाटील यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे
प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी केले. यामध्ये त्यांनी आत्मा चा उददेश सांगून
त्याव्दारे जिल्हयात राबविण्यात येणा-या कामांची माहिती दिली.
प्रांरभी ना. देवकर व मान्यवरांच्या
हस्ते दीपप्रज्वलन करुन शेतकरी प्रशिक्षण व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उदघाटन
करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषि अधिकारी बोरसे यांनी केले तर
आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन यांनी आभार मानले.
आत्मा योजना सन 2012 -13 अंतर्गत जळगांव जिल्हयात चांगले काम करणारे 34
शेतकरी व 8 गटांची पुरस्कारांसाठी निवड झालेली असून पुरस्कार प्राप्त शेतक-यांना
सन्मानचिन्ह, मानपत्र व दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात येत आहे. पुरस्कार
प्राप्त शेतकारी पुढीलप्रमाणे
जळगांव तालुका - राजेंद्र दत्तात्रय नेमाडे (मोहाडी), भास्कर
किसन नाईक - (मेहरुण),जितेंद्र रघुनाथ पाटील (ममुराबाद), लताबाई डिंगबर बारी (शिरसोली), भुसावळ तालुका गोरलाल दरबार जाधव -
(मांडवे दिगर), नितीन मुरलीधर इंगळे (पिंपळगांव
खुर्द), रविंद्र दयाराम पाटील (तळवेल), रावेर तालुका- मुकेश दशरथ पाटील (तांदलवाडी),
दिलीप गंभीर पाटील (ऐनपूर), मुक्ताईनगर तालुका – इतबार रमजान तडवी (जोधनखेडा पो.
पारंबी), रुषिकेश अशोक महाजन (नायगांव बु), बोदवड तालुका – रघुनाथ नामदेव धांडे (साळशिंगी),
यावल तालुका – अनिल दंगलराव साठे (चिंचोली), सौ. नलिनी सुभाष सोळुंके (चिंचोली),
अमनेर तालुका – विजय साहेबराव पाटील (सारबेटे), भाऊराव संतोष पाटील (राहेडवे),
धरणगांव तालुका – डिंगबर भगवान नारखेडे (साळवा),
मधुकर नामदेव देशमुख (अनोरे), चोपडा तालुका – हिरालाल छन्नू पाटील(कुरवले), कुलदीप
भरतसिंग पाटील (विरवाडे), पारोळा तालुका – विकास रमेश पाटील (म्हसवे), चतुर
बाबुराव पाटील (दळवेल), एरंडोल तालुका – चुनिलाल महादू पाटील (पिंपळकोठे बु/) /,
यादव हुला महाजन (आडगांव), गुलाब भादू पाटील (पिंप्री प्र. चा),, पाचोरा तालुका –
विजय धर्मा महाजन (नगरदेवळा), राकेश रमेश महाले (नगरदेवळा), भडगांव तालुका – बलराज
नारायण पाटील (वरखेड), आधार भावराव पाटील(कजगांव), मधुकर विश्राम पाटील (गिरड),
चाळीसगांव तालुका – महेश वसंतराव शेलार (तळवेल), किरन भिमराव पवार (घोडेगांव),
जामनेर तालुका – प्रकाश बाजीराव पाटील (हिवरखेडे बु //), प्रल्हादराव दौलतराव
देशमुख (पहुरपेठ), नवनिर्मिती शेतकरी मंडळ
(असोदा), जागृती महिला कृषी विज्ञान मंडळ (मस्कावद), स्व. पंजाबराव देशमुख फॉमर्स
क्लब (शेवरी), श्री. लोटांगण महाराज कृषि
विकास बचत गट (साळशिंगी), सत्यसाईबाबा कृषि विज्ञानमंडळ (चिंचोली), जय भवानी कृषि
विज्ञान मंडळ (उमरे), राधाकृष्ण कृषी
विकास संस्था (कल्याण होळ), राजमाता जिजाऊ शेतकरी गट (मंगरुळ) इत्यादी
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment