Monday, 18 March 2013

राज्य शासनाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी 25 मार्च पर्यंत अर्ज करावेत



              जळगांव, दि. 18 :- राज्य शासनामार्फत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार , शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक / कार्यकर्ते ), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याकरिता सन 2009 – 10 व सन 2010 – 11 या वर्षाच्या पुरस्कारा साठी दि. 25 मार्च 2013 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा पुणे यांनी दिली आहे.
          सदर पुरस्कारासाठी अर्ज करण्याची 31 मे 2013 ही मुदत रद्द करण्यात येत असून इच्छुकांना 25 मार्च 2013 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात येत आहे.
           या संबंधी अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत , महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय उपसंचालक नाशिक व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांचेशी संपर्क साधावा , असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment