जुनी रद्दी खरेदीसाठी दरपत्रक सादर
करण्याचे
जिल्हा माहिती कार्यालयाकडून आवाहन
जळगाव, दिनांक 11 ऑक्टोबर (जिमाका) : जळगाव आणि चाळीसगाव
येथील जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी रद्दी, पुस्तके व वृत्तपत्र विकणे आहे. तरी
रद्दी विक्रेत्यांनी या संदर्भात दरपत्रक सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी,
जळगाव यांनी केले आहे. बातमी प्रसिद्ध झाल्याच्या सात दिवसांच्या आत रद्दी विक्रेत्यांनी
याबाबतचे दरपत्रक जळगाव येथील जिल्हा माहिती कार्यालयात जमा करावे. योग्य दराने रद्दी
खरेदी करणाऱ्या विक्रेत्याला सर्व रद्दी विकली जाणार आहे. दरपत्रक सादर करण्यासाठी
जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, (टप्पा क्रमांक 3), पहिला मजला,
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, जळगाव येथे संपर्क करावा.
No comments:
Post a Comment