Thursday, 10 October 2024

दिपावली सणानिमित्त फटाका विक्रेत्यांनी तात्पुरत्या विक्री स्टॉल परवाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिपावली सणानिमित्त फटाका विक्रेत्यांनी तात्पुरत्या
विक्री स्टॉल परवाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक १० ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : दिपावली सणानिमित्त फटाका विक्रेत्यांना तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित पद्धतीने सर्व बाबींची पुर्तता करूनच अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यामध्ये जळगांव शहर, जळगांव तालुका व जामनेर तालुक्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री परवाना देण्यात येतो. सदरचा परवाना मिळवण्यासाठी फटाका विक्रेत्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत फटाका विक्रेत्यांना काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. ज्यामध्ये अर्ज व अर्जदाराचे 2 फोटो, जागेचा पुरावा व नकाशा, ज्याच्या जागेवर दुकान आहे त्यांचे संमतीपत्र / करारनामा / 100 रुपयाचा स्टॅम्प, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांचा नादेय प्रमाणपत्र यासोबतच पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र 100 रुपये स्टॅम्पवर आणि चलन आवश्यक असणार आहे.

तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज आणि सर्व कागदपत्रे कार्यालयास सादर केल्याशिवाय कुणालाही चलन पास करुन परवाना मिळणार नाही. याची सर्व फटाका विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. तसेच कुणीही विनापरवाना फटाका विक्री करणार नाही याची दक्षता घ्यावी, विनापरवाना विक्री केंद्र सुरु केल्यास संबधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment