मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदाच्या
प्रकृतीबाबत विचारपूस
मुंबई, दिनांक १ ऑक्टोंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघातातबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अभिनयाद्वारे लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थासाठी मुख्यमंत्री यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment