Monday, 7 October 2013

पुनर्वसन व जलसंपदा विभागाकडे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार : पालकमंत्री संजय सावकारे



 पुनर्वसन जलसंपदा विभागाकडे
प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार
: पालकमंत्री संजय सावकारे

            जळगाव दि.7 : जिल्हयात झालेल्या पर्जन्यवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हाभरात असलेले विविध प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून प्रकल्प बाधीतांचे पुनर्वसनाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने  मदत पुनर्वसन जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावणार असल्याचे कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. पुनर्वसनाच्या कामात हयगय करणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही  पालकमंत्री ना.सावकारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुनर्वसन विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले.
            जिल्हयातील हतनूर, वाघूर, गिरणा, अंजनी , बहुळा, बोरी या विविध प्रकल्पांचा आढावा घेतांना प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती त्या अनुषंगाने पुनर्वसनाच्या कार्यवाही बाबत माहिती जाणून घेतांना नागरी सुविधा, अतिक्रमण, नाले सफाई, स्थलांतरण, पाणी पुरवठा योजना या बाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, अधिक्षक अभियंता व्हि.डी.पाटील यांच्या सह जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांसमवेत राष्ट्रीय महामार्गाच्या कामकाजाचा आढावा

            राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांचेकडे दिनांक 1 एप्रिल, 2013 पासून चौपदरीकरणासाठी वर्ग झालेला आहे. जिल्हयात सततधार पावसामुळे या मार्गाची बिकट अवस्था झाली असून मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तरी या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरु झाले नसले तरी या मार्गातील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सुचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता चमालपुरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी यावेळी दिल्या.

                                                                     * * * * * *

No comments:

Post a Comment