शासनाच्या सहाव्या आर्थिक गणनेसाठी जनतेने सहकार्य करावे
: जिल्हा साख्यिकी अधिकारी पवार
चाळीसगाव दिनांक 23 :- केंद्रीय
सांख्यिकी कार्यालय,
सांख्यिकी आणि कार्यक्रम
मंत्रालय,
भारत सरकार आणि
अर्थ व सांख्यिकी, मंत्रालय, महाराष्ट्र
शासनाच्या आदेशानुसार सहावी आर्थिक
गणना कार्यक्रम हाती घेण्यात
आलेला आहे. दिनांक
01 ऑक्टोंबर, 2013 ते 15
नोव्हेंबर,
2013 या कालावधीत हे सर्व्हेक्षण
पुर्ण करावयाचे असुन जनतेने
सहकार्य करावे असे
आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी आर.ए.पवार यांनी आज येथील हंस चित्रमंदीरात
आयोजित प्रशिक्षण शिबीरात केले. यावेळी
नायब तहसिलदार नानासाहेब आगळे,
सांख्यिकी विस्तार अधिकारी डी.डी.शिरके,
डी.पी.राजपूत,
प्रशिक्षणाचे मास्टर्स ट्रेनर प्रा.डॉ.निकमसर प्रा.डॉ.बडगेसर आदि उपस्थित
होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना पवार म्हणाले
की,
सहावी आर्थिक गणना शासनाच्या
आर्थिक धोरणासाठी होत असून
दारिद्रयरेषेच्या सर्व्हेशी याचा संबंध
नाही. शासनाच्या विकास योजना
तयार करण्याचा प्रमुख उद्देश या सर्व्हेक्षणाचा आहे. तसेच सदरची माहिती
ही गोपनीय ठेवण्यात येणार असल्याने
जनतेने कुठल्याही भुलथापांना बळी न पडता आपली खरी
माहिती संकलन कर्मचा-यांना
उपलब्ध करुन द्यावी
असे आवाहन त्यांनी
केले आहे. तसेच
आर्थिक गणनेकरिता लागणारी माहिती उपलब्ध न करुन
देणे,
चुकीची माहिती देणे त्याच
बरोबर प्रगणक व पर्यवेक्षकांनी चुकीची माहिती नोंदविणे यावर कायदेशीर
कारवाई करण्याची तरतूद असून
शासनाच्या या सर्व्हेक्षणासाठी अचुक माहिती उपलब्ध करुन देणे
व नोंदविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी
मार्गदर्शन करतांना म्हणाले की,
आर्थिक गणना म्हणजे
देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची
संपुर्ण मोजणी असून
आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर नियोजनासाठी
केला जातो. देशाच्या
अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या सहभागाची आकडेवारी प्राप्त करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणा-या सर्व्हेक्षणाची फ्रेम तयार
करण्यासाठीही केला जाणार
आहे. शासनाच्या विविध विकास
योजना तयार करण्यासाठी
या सर्व्हेक्षणाचा आधार घेण्यात
येणार असल्याने जनतेने या कार्यक्रमाचे
महत्व ओळखून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे
सांगितले.
या प्रशिक्षण वर्गाचे मास्टर्स ट्रेनर प्रा.डॉ.निकम सर व प्रा.डॉ.बडगे सर यांनी
उपस्थित प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रात्याक्षिक व मार्गदर्शन करुन या कार्यक्रमावर आधारित माहितीपट प्रोजेक्टरव्दारे दाखविण्यात आला. तालुक्यात
एकूण 608 गट पाडण्यात आले असून
या सर्व्हेक्षणासाठी 203 प्रगणक
व 101 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सांख्यिकी
विस्तार अधिकारी डी.डी.शिरके,
डी.पी.राजपूत,
कार्यालय अधिक्षक नेरे यांनी
केले तर कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी तहसिल कार्यालयातील
सि.पी.पाटील,
विशाल मराठे,
जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी यांच्यासह आदि कर्मचा-यांचे
सहकार्य लाभले. यावेळी प्रगणक व पर्यवेक्षक
मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment