Tuesday, 18 March 2025

जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी


जळगाव दि. 18 ( जिमाका वृत्तसेवा )- जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील (एम एस सर्जन) जळगाव यांनी दुर्बीणीद्वारे अपेंडिक्स फुटलेल्या रुग्णावर अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.


        भूलतज्ञ डॉ. हेमंत पाटील यांनी रुग्णाला योग्य भूल देऊन हे अती जोखमीची अशी शस्त्रक्रिया पार पाडली व रुग्णालयातील परिसेविका वैशाली पाटील, तुळसा माळी अधिपरिचारीका, शिला पाटोकार अधिपरिचारीका, निर्मला शिरसाठ अधिपरिचारीका व सर्व कक्षसेवक तसेच शस्रक्रियां विभागातील इतर सर्व कर्मचारी यांनी मदत केली.


          मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी मदतीसाठी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.

No comments:

Post a Comment