जळगाव, दि. २२ मार्च (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील विविध विकासकामांवर आधारित माहितीपट जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केले असून, त्यांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियोजन भवन येथील बैठक सभागृहात संपन्न झाले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांना विविध सोयीसुविधांचा लाभ मिळत आहे. या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने माहितीपटांची निर्मिती केली आहे.
No comments:
Post a Comment