निवडणूकीच्या अनुषंगाने
चाळीसगावात
पोलीस प्रशासनाचे शक्ती
प्रदर्शन
चाळीसगांव,दिनांक 11:-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव मतदार संघात
कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी व भयमुक्त वातावरण निर्मीतीसाठी पोलीस
प्रशासनाच्या वतीने शहरातील घाटरोड, नागद रोड, हुडको, चौधरी वाडा, सराफ बाजार या
परिसरात रुट मार्च करण्यात आला. निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी व
मतदारांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी अशा प्रकारचा रुट मार्च घेण्यात आल्याचे
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले आहे.निवडणूक कालावधीत बंदोबस्तासाठी 1
अप्पर पोलीस अधिक्षक, २ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, ३०९ पोलीस कर्मचारी,
१२८ होमगार्ड तर गुजरात राज्यातील बॉर्डर विंग ची एक तुकडी असा फौजफाटा देखील
निवडणूक कर्तव्यासाठी सज्ज झाला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कळविले
आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment