Monday, 6 October 2014

017-चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आचार संहितेचा दुसरा गुन्हा दाखल

017-चाळीसगाव विधानसभा मतदार संघात
आचार संहितेचा दुसरा गुन्हा दाखल

            चाळीसगांव,दिनांक 06 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने दिनांक 12 सप्टेंबर 2014 पासून संपुर्ण राज्यात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झालेली असून त्या अनुषंगाने 017-चाळीसगाव विधानसभा मतदार संघात दिनांक 05 ऑक्टोंबर, 2014 रोजी तरवाडे बु. परिसरात भरारी पथक क्रं. ३ चे पथक गस्त घालत असतांना त्यांना विना परवाना राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन क्रं. एमएच-16/बीएम 2185 क्रमांकाचे मॅजीक वाहन आढळून आले सदर वाहनावर आचार संहिता भंगाबाबत कारवाई करुन पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे भरारी पथक क्रं.३ चे प्रमुख श्री.ए.पी.भदाणे फिर्याद दाखल केली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चाळीसगांव गुन्हा क्रमांक 3064/2014 दिनांक 05.10.2014 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे.
            तसेच प्रत्येक पक्षप्रमुखांना या प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन करण्यात येते की, आदर्श आचार संहितेचे उल्लघन होणार नाही याची दक्षता घेऊन कोणतेही विना परवाना वाहन प्रचारासाठी वापरण्यात येऊ नये
                                                              * * * * * * * *

उप माहिती कार्यालय चाळीसगाव
नवीन जागेत स्थलांतरीत

            चाळीसगांव,दिनांक 06 :- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उप माहिती कार्यालय, चाळीसगांव  हे बोरसे निवास, लक्ष्मी नगर, नारायणवाडी, चाळीसगाव या जागेत मागील सहा वर्षापासून कार्यरत होते. तरी सदर कार्यालय हे माहे ऑक्टोंबर-2014 पासून नवीन जागेत म्हणजेच  छाया निवास, पहिला माळा, स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा इमारत, भडगांव रोड चाळीसगांव, जिल्हा जळगांव  या इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले असून सर्व संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी  असे आवाहन प्र.माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


                                                             * * * * * * * *

No comments:

Post a Comment