Wednesday, 12 September 2012

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बॅके मार्फत शिष्यवृत्ती योजना



          जळगांव, दि. 12 - आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बॅकेमार्फत भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ई – स्कालरशिप योजना सन 2012 – 13 या चालु शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी  http://etribal.maharashtra.gov.in या संगणक प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            सन 2012-13 या वर्षात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांचे अधिनस्त असलेल्या जळगांव जिल्हयातील मॅट्रीकेत्तर शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांनी कोर बॅकींग (राष्ट्रीयकृत बॅकेत) खाते उघडण्यात यावे. जेणे करुन ऑनलाईन ॲप्लीकेशनव्दारे भारत सरकार शिष्यवृतीचा लाभ मिळू शकेल.
            तरी जळगांव जिल्हयातील सर्व संबंधीत विद्यार्थी / विद्यालय यांनी याबाबत तातडीने अमंलबजावणी करावी असे आवाहन  प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  यावल यांनी केले आहे.
                                                                0 0 0 0 0


No comments:

Post a Comment