Friday, 14 September 2012

महाराष्ट्र राज्य विकास कार्यक्रम 10 वर्ष मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे कर्जरोखे 18 सप्टेंबर रोजी विक्रीला



मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्ष मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे एका अधिसूचनेद्वारे विक्रीला काढले असून भारतीय रिझर्व बँकेमध्ये दिनांक 18 सप्टेंबर, 2012 रोजी स्पर्धात्मक बिडस्, संगणकीय प्रणालीद्वारे, निगोशिएटेड डिलिंग सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 या वेळेत सादर करण्यात येणार आहेत. अस्पर्धात्मक बिडस्‌, संगणकीय प्रणालीद्वारे, निगोशिएटेड डिलिंग सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 यावेळेत सादर करण्यात येतील.
लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व बँक, मुंबई तर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिध्द करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान 20 सप्टेंबर 2012 रोजी करण्यात येईल.
यशस्वी झालेल्या बिडर्सकडून 20 सप्टेंबर 2012 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई, यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.
कर्जरोख्याचा कालावधी 10 वर्षाचा असून 20 सप्टेंबर 2012 पासून हा कालावधी सुरु होईल. 20 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल.
अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दर एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी 20 मार्च आणि 20 सप्टेंबर रोजी सहामाही पध्दतीने करण्यात येईल.
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकींग विनियम अधिनियम, 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) च्या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री - खरेदीसाठी अनुज्ञेय असतील.
महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग-एक- मध्य उप-विभाग यामध्ये याबाबतची विनिर्दिष्ट अधिसूचना 14 सप्टेंबर,2012 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment