Friday, 14 September 2012

राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

मुंबई, दि. 14 : राज्यातील 228 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आली.  यामध्ये अनुसूचित जातींसाठी 26, अनुसूचित जमातींसाठी 10, इतर मागासप्रवर्गासाठी 62 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 130 नगर परिषदा / नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे.  प्रत्येक प्रवर्गामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. सन 2010 साली देण्यात आलेल्या आरक्षणाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे.
मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली.  याप्रसंगी नगरविकास प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरपालिका प्रशासन संचालक आबासाहेब जऱ्हाड, आमदार सुरेश जेथलिया आणि राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरुवातीला राज्यमंत्री जाधव यांनी आरक्षण सोडतीतील एक चिठ्ठी काढून सोडतीला प्रारंभ केला आणि नंतर उपस्थित सर्व प्रतिनिधींना या सोडतीत सहभागी होण्याची संधी दिली. जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे आहे.
अनुसूचित जाती
जत, माहूर, वर्धा, देवळाली प्रवरा, सावनेर, परांडा, घाटंजी, इस्लामपूर, खापा, औसा, सातारा, भोकरदन, गंगापूर, अंबरनाथ, सोनपेठ, पाथर्डी, मलकापूर सातारा, वरुड, माजलगाव, हिंगोली, मोर्शी, वणी, अकोट, मुल, जालना आणि माथेरान.
अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली, माजलगाव, अंबरनाथ, वर्धा, मूल, वणी, औसा, मोर्शी, घाटंजी, मलकापूर, जालना, गंगापूर आणि अकोट.
अनुसूचित जमाती
मुरुड, जंजिरा, शिंदखेडा, सटाणा, मुखेड, राजुरा, बल्लारपूर, जुन्नर, देसाईगंज, दिग्रस आणि चोपडा.
अनुसूचित जमाती (महिला)
चोपडा, जुन्नर, शिंदखेडा, राजूरा आणि बल्लारपूर.                                                                         
 इतर मागास प्रवर्ग
दौंड,पाचगणी, अक्कलकोट, गंगाखेड, वाशिम, अंमळनेर, तेल्हारा, धामणगाव रेल्वे, पनवेल, गडहिंग्लज कंधार, रोहा, मनमाड, शिरुर, करमाळा, तुळजापूर, धरणगाव, येवला, शेगाव, नळदुर्ग, भुसावळ, कुर्डूवाडी, परतूर, बीड, मूर्तिजापूर, लोणार, कामठी, अंजनगावसुर्जी,  इगतपुरी, करुदंवाड, श्रीमरामपूर, पेण, मलकापूर, रत्नागिरी, इंदापूर, लोणावळा, उमरेड, तिरोडा, सिल्लोड, सावदा, तुमसर, राहता, खुलताबाद, भगूर, जामनेर, चिपळूण, श्रीवर्धन, रिसोड, श्रीगोंदा, कळमेश्वर, सेलू, देऊळगाव राजा, पुलगाव, यवतमाळ, डहाणू, दापोली, जिंतूर, बिलोली, अंबाजोगाई, मालवण, मैंदर्गी, शिरपूर वरवाडे.
 इतर मागासवर्ग महिला-
करमाळा, राहाता पिंपळस, श्रीवर्धन, वाशिम, अंबाजोगाई, देऊळगाव राजा, दौंड, पनवेल, मैदंर्गी, जामनेर, जिंतूर, भगूर, पेण, अंजनगावसुर्जी, बीड, गंगाखेड, अंमळनेर, शिरुर, श्रीगोंदा, मलकापूर (बुलढाणा),धामणगाव रेल्वे, तुळजापूर, कामठी, कुर्डुवाडी, लोणार, कळमेश्वर, अक्कलकोट, डहाणू, उमरेड
सर्वसाधारण महिला प्रवर्ग-
गडचिरोली, अहमदपूर,अंबड, सिन्नर, आष्टा, शहादा, ब्रम्ह्पुरी, पवनी, मेहेकर, पुसद, उमरखेड, राहुरी, नवापूर, तळोदा, शिंदी, कळंब, कुंडलवाडी, सिंदखेड राजा, कोपरगाव, भूम, कारंजा, मूदखेड, त्र्यंबक, वैजापूर, देवळी, खेड, महाबळेश्वर, इचलकरंजी, एरंडोल, दुधनी, पांढरकवडा, रामटेक, कराड, जेजुरी, कळमनुरी, दर्यापूर, नरखेड, भोर, रावेर, वरोरा, उमरगा, आर्वी, वडगांव, रहिमतपूर, तळेगांव दाभाडे, भडगांव, लोहा, निलंगा, मुरगूड, संगमनेर, मंगलवेढा, पंढरपूर, कणकवली, मानवत, केज, राजापूर, फलटण, शेंदूरजनाघाट, दोंडाइचा वरवाडे, चांदूरबाजार, नांदूरा, सासवड, कागल, पालघर आणि देगलूर.
उरलेल्या 65 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

No comments:

Post a Comment