Thursday, 19 July 2012

जिल्हयात राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना लागू

जळगांव, दि. 19 :- केंद्र शासनाने भारतीय कृषि पिक विमा कंपनीच्या सहकार्याने जळगांव जिल्हयात अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय पिक विमा योजना लागू केली असून सदरच्या योजनेत जिल्हयातील शेतक-यांनी 31 जुलै 2012 पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस. मुळे यांनी केले आहे.
            पिक निहाय पिक संरक्षण हप्ता दर विमा संरक्षित रक्कम तसेच या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सर्व तालुका कृषि अधिकारी कार्यालये, जळगांव / पाचोरा / अंमळनेर उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालये, आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.         
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment