जळगांव,
दि. 26 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा फेबू / मार्च 2012
परीक्षेस प्रविष्ठ झालेले व सन 2011-12 या
वर्षी खुल्या वयोगटातील क्रीडा स्पर्धामध्ये खेळलेल्या 19 वर्षाखालील खेळाडू
विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यास शासनाने दिनांक 31 जुलै 2012 पर्यत
मुदतवाढीस खास बाब म्हणून मान्यता दिलेली असल्याने अशा खेळाडू विद्यार्थ्यांचे
प्रस्ताव दिनांक 31 जुलै 2012 पर्यत गुणपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसह मंडळ
कार्यालयात स्विकारण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी, विद्यार्थी
व पालकांनी तसेच सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे विभागीय सचिव महाराष्ट् राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका
पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment