Tuesday, 8 May 2012

जळगांव पंचायत समितीची लवकरच स्वत:ची इमारत : ना.गुलाबराव देवकर


      जळगांव, दि. 8 :- पंचायत समितीला स्वत:ची वास्तु उभी करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी जळगांव येथे केले. जळगांव पंचायत समिती कार्यक्षेत्रातील मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्याना त्यांच्या हस्ते साहित्य वाटप कार्यक्रमांत ते बोलत होते. सानेगुरुजी सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गप्फार मलीक हे होते. ताडपत्री, पिठाची गिरणी, पन्हाळी पत्रे, शिलाई मशीन, भजनी साहित्यांचा समावेश यात होता.
     ना. देवकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शासन गोर गरिब जनतेसाठी विविध विकास योजना तयार करते ग्रामीण पातळीवर या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम पंचायत समित्याव्दारे केले जाते. ख-या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत ही योजना पोहचल्यास त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती होईल. यासर्व विकास योजना पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत अधिका-यांची असून ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याची संधी पदाधिका-यांना प्राप्त झालेली आहे. ज्या योजना कागदांवरच न राहता शेवटच्या माणसांपर्यत पोहचविण्‍याचे काम केल्यास आपण सर्व सामान्यासाठी काहीतरी करु शकलो असे आत्मिक समाधान लाभेल. काही पुण्य केल्याची अनुभूती होईल. योजना राबवितांना योजनांचे काम गुणवत्तापूर्ण होईल  याकडेही लक्ष दयावे. दुर्बल घटकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम जळगांव पंचायत समितीने सर्व प्रथम घेतल्याबद्दल सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन केले. या समारंभात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2010-2011 अंतर्गत प्रथम आलेल्या भादली येथील सरपंच, ग्रामसेवक व्दितीय जळके, तृतीय अनुक्रमे रु.15000,/- रुपये 15000/- आणि रु.10,000/- चा धनादेश ना. देवकर यांच्या हस्ते देण्यात आले.  (भादली ग्रामपंचायत पूर्वी तृतीय क्रमांक मिळाल्याने प्रथम क्रमांकाचे रु.25000/- यातून 10,000/- वजा करण्यात आले)
     पंचायत समितीचे सभापती दिलीप काशिनाथ कोळी, उपसभापती विजय ओंकार नारखेडे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी सौ. आशा पाडवी यांनी साहित्य वाटप योनजेची माहिती देवून  पंचायत समितीच्या कार्यालयाच्या जागेच्या अडचणीबाबत मान्यवारांना अवगत केले.
     या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री.बळीराम तोताराम सोनवणे, जि.प.सदस्या लिना पंकज महाजन, पंचायत समिती सदस्य पांडूरंग बाबुराव पाटील, सदस्या सौ.स्मिता प्रशांत पाटील, सदस्या सौ.हिराबाई सुनिल मोरे, सदस्या लता डिंगबर बारी, सदस्या सौ. जयश्री लिलाधार पाटील, रविंद्र पाटील, दिलीप धनगर परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच , नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अलताफ सर यांनी केले.
 * * * * *

No comments:

Post a Comment