जळगांव, दि. 28
:- जळगांव जिल्हास्तरीय खरिप
आढावा
2012 ची बैठक आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील
अल्पबचत
भवन
मध्ये
कृषि
राज्यमंत्री
गुलाबराव
देवकर
यांचे अध्यक्षते खाली
झाली.
जळगांव
जिल्हयाचे
भौगोलिक
क्षेत्र
11.64 लाख हेक्टर क्षेत्र असून
8.93 लक्ष हेक्टर क्षेत्र
लागवडी
लायक
असून
खरिपासाठी
साधारणपणे
8.33 लाख हेक्टर क्षेत्र आहे.
बैठकीत
सन 2012 -
13 च्या खरिप हंगामाचे
नियोजन
करण्यात
आले
असून
खरिपाचे
नियोजन
पुढीलप्रमाणे
आहे.
भात,
ज्वारी,
बाजरी,
मका
या तृणधान्यांसाठी 222700 हेक्टर
तूर,मूग, उडीद या कडधान्यांसाठी 132300 हेक्टर
क्षेत्र,
भुईमूग
सुर्यफूल,
तिळ,
सोयाबीन
या तेलबिया
पिकांसाठी
47200 हेक्टर कापसासाठी 401900 हेक्टर क्षेत्र नियोजन
असून
खरिपासाठी
823400 हेक्टर क्षेत्राचे नियोजन
असून
उसासाठी
19300 हेक्टर क्षेत्र असे
एकूण
823400 हेक्टर वरील नियोजन
बैठकीत
सादर
करण्यात
आले.
बैठकीत
महाबीज
व खाजगी
कंपन्यांकडून
उपलब्ध
व्हावयाच्या
बियाणे
वितरण,
खरिप
हंगामातील
रासायनिक
खतांचे
नियोजन
, कृषि निविष्टांचे गुणवत्ता
नियंत्रण,
कृषि
यांत्रिकीकरणाची विशेषमोहिम बैठक विकास, कडधान्य उत्पादन कार्यक्रम
राष्ट्रीय
अन्न
सुरक्षा
अभियान
विविध
विस्तार
योजना
राष्ट्रीय
फलोत्पादन
अभियान,
सुक्ष्म
सिंचन
रोजगार
हमी
योजनेसाठी
निगडीत
फळबाग
लागवड
कार्यक्रम,
वृक्ष
लागवड
कार्यक्रम,
शेतकरी
जनता
अपघात
विमा
योजना
, मृद व जलसंधारण शेततळे, महात्मा
फुले
जलभुमी
संधारण
योजना
पाणलोट
विकास,
कापूस
उत्पादक
शेतक-यांना
मदत,
बीज
प्रमाणीकरण
पीक
कर्ज
वाटप
60 योजनांबाबत सविस्तर चर्चा
करण्यात
आली.
बैठकीस
विधानसभेचे
विरोधी
पक्षनेता
एकनाथराव
खडसे,
जिल्हा
परिषद
अध्यक्ष
दिलीप
खोडपे,
खा.
ए.टी.
पाटील,
खासदार
हरिभाऊ
जावळे,
आमदार
कृषिभूषण
साहेबराव
पाटील,
आमदार
शिरीष
चौधरी,
आमदार
संजय सावकारे , आमदार दिलीप वाघ,
जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर
राजूरकर
, डॉ. एस.एस. अडसूळ , कृषि सहसंचालक आगडे,
कृषिसभापती
कांताताई
मराठे
व इतर
शासकीय
अधिकारी
व पदाधिकारी
उपस्थित
होते.
0 0
0 0
0
No comments:
Post a Comment