जळगांव, दि.
23 - अपंग
कल्याण आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य
पुणे मार्फत
शासन मान्यता
प्राप्त तुळजा
भवानी अपंग
औद्योगिक प्रशिक्षण
केंद्र देगलुर
या संस्थेत
महाराष्ट्र राज्य
व्यवसाय प्रशिक्षण
परीक्षा मंडळ
मुंबई मार्फत
मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी
15 ते
35 वयोगटातील
अपंग व
मुकबधीर मुला-मुलींना
प्रवेश देण्यात
येत आहे.
सदरील प्रशिक्षण
केंद्रात वेल्डर
कम फॅब्रीकेटर
/ शीट
मेटल, संगणक (हार्डवेअर
व ऑफीस ऍ़टोमेशन
ऍ़ड अकाऊंटीग)
शिवण व
कर्तनकला, इलेक्ट्रीशियन
आणि कंपोजिग
प्रिटीग ऍ़न्ड
बायडींग इत्यादी
अभ्यासक्रम प्रवेश
देण्यात येत
आहे. प्रवेशितांची
निवासाची व
वैद्यकीय औषधोपचाराची
व प्रशिक्षण साहित्याची
विनामुल्य सोय
केली आहे.
तरी
इच्छूक अपंग
व मुकबधीर मुला-
मुलीनी किंवा
पालकांनी दिनांक
15 जुलै
2012 पर्यत
प्राचार्य, तुळजा भवानी
अपंग औद्योगिक
प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी
नगर समोर, रामपुर
रोड देगलुर, ता.
देगलुर जि. नांदेड
येथे पत्रव्यवहार
करावे किंवा
समक्ष भेटावे.
*****
अंमळनेर येथील मागासवर्गीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश
जळगांव,
दि.23:-
शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत
कार्यरत असलेले डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,
अंमळनेर जि. जळगांव
सन 2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी अनु.जाती,
अनु. जमाति,
वि.जा. भ.ज. आर्थिक
दृष्टया मागासवर्ग,
अनाथ,
अपंग इ. प्रवर्गातील
विदयालय,
व महाविदयालय विभागातील गरजू विदयार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज मागविणेत येत आहे.
या प्रवर्गातील जागेसाठी विदयालय विभाग व महाविदयालय विभागाकरिता छापील अर्ज
विनामुल्य वाटप सुरु
आहे. सदर अर्ज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुंलाचे शासकीय वसतिगृह अंमळनेर जि.
जळगांव येथे उपलब्ध
आहेत प्रवेश त्या त्या
प्रवर्गातील राखीव जागेवर
गुणवत्ते नुसार दिला
जातो.
प्रवेशितांना वसतिगृहामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक
साहित्य,
पुस्तके निर्वाह भत्ता इ. सोयी सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात तरी
गरजू विदयार्थ्यांनी प्रवेश अर्जासाठी संपर्क साधावा.
अर्जासोबत गेल्यावर्षाचे गुणपत्रक,
शाळा सोडल्याचा दाखला,
उत्पन्नाचा दाखला,
जातीचा दाखला,
दोन पासपोर्ट फोटो,अर्जास
लावणे व घरचा
टेलीफोन क्र असणे
आवश्यक आहे. असे
गृहपाल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुंलाचे शासकीय वसतिगृह अंमळनेर यांनी कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment