Tuesday, 8 May 2012

वाघूर धरणासाठी मंजूर निधी मार्च अखेर खर्च करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

जळगांव दि.7:- वाघूर धरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांचा निधी मार्च 2013 अखेर खर्च करण्यात यावा अशा सूचना आज राज्याचे कृषि,परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी अधिका-यांना दिल्यात.येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात वाघूर कॅनल जमीन संपादन संदर्भात संबंधीत अधिका-यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
जमीन संपादन कामी कलम 6 ची नोटीस काढणे, ज्या शेतक-यांच्या जमीन कॅनलसाठी संपादित केलेल्या आहेत त्या शेतक-यांना मोबदला अदा करणे सर्व यंत्रणेतील अधिका-यांनी   आपआपसांत चांगला समन्वय ठेवून पाठ पुरावा करुन कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. शासकीय पातळीवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पालकमंत्री म्हणून मला अवगत करुन त्यांची सोडवणूक करावी असेही ना. देवकर म्हणाले खामखेडा-अमोदा या परिसरातील जमीन मोजणीचे काम त्वरीत हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

14 मे पासून आसोदा भादली परिसरात वाघूरचे पाणी
आसोदा भादली परिसरातील पूर्ण झालेल्या कॅनलव्दारे 14 मे रोजी पालकमंत्री ना. देवकर यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमानंतर ना. देवकर संपूर्ण कॅनलच्या कामांची पहाणी करणार आहेत.

नाटयगृह संकल्पचित्रास मंजूरी
जळगांव शहरात 1200 आसन व्यवस्था असलेले नाटयगृहाचे संकल्पचित्र मुंबई येथील वास्तूविशारद श्री. ढोरे  यांनी तयार केले असून त्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच धरणगांव बालकवी स्मारकासाठी  जागा संपादन करण्याची कार्यवाही त्वरीत करण्याच्या सूचना तसेच बहिणाबाई स्मारकांचे संकल्पचित्र व अंदाजपत्रके तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. म्हसावद येथील उड्डाण पुलाच्या कामाचाही आढावा यावेळी पालकमंत्री ना. देवकर यांनी घेतला.
या बैठकीस कार्यकारी अभियंता एस. डी. सोनवणे, भूसंपादन अधिकारी दीपमाला चौरे, प्रविण महिरे, सैदाणे, स्वीय सहाय्यक भूसंपादन व्ही. एन. अहिरे, वाघूर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेश मोरे, ब-हाटे, अधिक्षक भूमी अभिलेख गोंडवाल, जिल्हा पुरवठा अधिकारी के. सी. निकम, वाल्मीक पाटील, विलास पाटील आदि उपस्थित होते.

0 0 0 0

No comments:

Post a Comment