जळगांव, दिनांक 30:- बंदचे आवाहन करणे पूर्णत: बेकायदेशीर असल्याने
नागरिकांनी बंद मध्ये सहभाग घेऊ नये जिल्हा
प्रशासन व पोलिस प्रशासनाने सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनास
सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक प्रकाश
मुत्याळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या विविध संघटनांच्या
पदाधिकारी व शासकीय अधिका-यांच्या बैठकीत केले.
पेट्रोल
दरवाढी विरोधात काही राजकीय संघटांनानी 31 मे 2012 रोजी भारत बंदचे आवाहन केले
आहे. बंद काळात जिवनावश्यक वस्तुंचा
पुरवठा सुरळीत राहणार असून रस्ते व रेल्वे वाहतूकही सुरु राहणार आहे. तरी नागरिकांनी कायदा व सुव्यस्था अबाधित राहिल
व जिल्हयात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी .
बंदच्या दिवशी ऑटो रिक्षा सुरु राहणार असून भाजीपाला, दुध, स्वयंपाकाचा गॅस,
पेट्रोल डिझेल विक्री, किराणा भूसार, जव्हेरी बाजार आदि संस्था सुरु राहणार असून
कृषि उत्पन्न बाजार समितीही नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहेत. आरोग्य सेवा व अग्निशमन सेवाही सुरु राहणार
आहेत. बंदच्या काळात गोरगरीब जनतेचे व
नागरिकांचे नुकसान होणार नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही यावेळी
करण्यात आले.
बैठकीस
अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, विविध
संघटांनांचे प्रतिनिधी , प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व विविध शासकीय कार्यालयांचे
प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
* * * * * * *
No comments:
Post a Comment