Monday, 28 May 2012

शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश


    जळगांव, दि. 28 :- शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र एन.12 हडको, औरंगाबाद या संस्थेत सन 2012 - 13 या शैक्षणिक वर्षासाठी प्रौढ अस्थिव्यंगाना प्रवेश देणे आहे. या संस्थेत शिवणकला, आर्मेचर वायडीग, (विद्युत) हस्त जुळाई छापाई, पुस्तक बांधणी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी साठी फिटर या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकला पुस्तक बांधणीसाठी चौथी उत्तीर्ण हस्तजुळाई छापाई तसेच आर्मेचर वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार 9 वी उत्तीर्ण असावा या संस्थेत वय वर्ष 16 ते 45 या वयोगटातील अस्थिव्यंगानाच प्रवेश दिला जातो.
       अंध, मुकबधिर, मतीमंद या प्रवर्गातील मुलांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेशित प्रशिक्षणार्थीना निवास, भोजन अंथरुण, पांघरुण शैक्षणिक साहित्य, विद्यावेतन, वैद्यकीय औषध उपचार इ. सोय विनामुल्य करण्यांत येते.
     तरी गरजुनी प्रत्यक्ष किंवा पत्राव्दारे या संस्थेस संपर्क साधुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयातीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून दिनांक 1 जुन 2012 पर्यत विनामुल्य मिळतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जुन 2012 ही आहे.
     वेळेअभावी प्रवेश अर्ज मागविण्यास अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी साध्या कागदावर स्वत:चे संपुर्ण नांव, वय, पुर्ण पत्ता, शिक्षण, मिळालेली गुण रहिवासी अपंगत्व इ. उल्लेख करुन त्यासोबत संबंधित प्रमाणपत्राच्या छायांकित प्रमाणित प्रतीसह अर्ज करावा. अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, इयत्ता 4 थी 9 वी पासचे गुण पत्रक इत्यादी , असे अधिक्षक , शासकीय प्रौझ् अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, एन. 12 हडको, औरंगाबाद यांनी कळविले आहे.        
                                                                                         *****
शासकीय मुलींचे वसतीगृहामध्ये प्रवेश
     जळगांव, 28   :- जळगांव येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहामध्ये सन 2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरु आहे.
वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येतो.
वसतीगृहामध्ये इयत्ता आठवी , अकरावी, बी.ए,बी.कॉम, बी. एस्सी इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थींनींना शासनामार्फत मोफत निवास,भोजन,क्रमीक पुस्तके शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येत असून दरमहा रु. 600/- प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.
 इच्छुक विद्यार्थीनीनी अधिक्षिका, शासकीय मुलींचे वसतीगृह जळगांव येथे संपर्क साधावा असे अधिक्षिका यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे.    




No comments:

Post a Comment