जळगांव, दि. 17 :- भारतीय प्रजासत्ताक
दिनाचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ दि. 26 जानेवारी 2013 रोजी सकाळी 9.15 वा.
पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री यांचे हस्ते होणार असून त्यानंतर शालेय
विदयार्थ्याव्दारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार असल्याचे जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते.
यावेळी पोलिस अधिक्षक एस.जयकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील
गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, तहसिलदार कैलास देवरे, उपअभियंता
सार्वजनिक बांधकाम बी.एस. फेगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत,
एकात्मीक आदिवासी विकास कार्यालयाचे प्रकल्प संचालक एस.जी. दुधाळ, आदिसह सर्व
संबंधीत विभागाचे प्रमुख व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजाराहेणाचा आयोजनाबाबत सर्व संबंधीत विभागांनी
दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची सूचना केली. तसेच सांस्कृतिक
कार्यक्रमांमध्ये एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळेतील विदयार्थ्यांचे
पारंपारिक आदिवासी नृत्य, एम.जे. कॉलेजच्या विदयार्थ्यांचा कार्यक्रम, विविध
विभागांचे चित्ररथ आदि कार्यक्रम समाविष्ठ करावेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हयात
टंचाईची गंभीर परिस्थिती असल्याने पाणी वापराबाबत प्रबोधनापर पथनाटय दिशा
बहुउद्देशीय संस्थेने सादर करावे तसेच सामाजीक एकात्मतेवर आधारित कार्यक्रमाचे
आयोजन करण्याची सूचना श्री. राजूरकर यांनी केली.
निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी
शासन निर्णयान्वये जिल्हयात सकाळी 8.30 ते 10 या वेळेत ध्वजारोहणाचा कोणताही
समारंभ ठेवू नये असे सांगितले. तसेच शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सकाळी
9.15 वा. पोलिस कवायत मैदान येथे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणाचा
कार्यक्रम सकाळी 8 वा. होणार असल्याचे सांगितले.
तरी जळगांव शहरातील नागरिकांनी, विदयार्थ्यांनी सदरच्या ध्वजारोहण व
सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment