Thursday, 17 January 2013

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणची विशेष मोहिम



        जळगांव, दि. 17 :- जळगांव तालुक्यातील सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अदयावत लेखापरिक्षण अहवाल ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अदयापापपावेतो सादर केलेले नाहीत अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लेखापरिक्षण अहवाल तात्काळ तालुका उपनिबंधक  सहकारी संस्था जळगांव यांचे कार्यालयात सादर करावेत. तसेच ज्या संस्था आपले लेखापरिक्षण अहवाल सादर करणार नाहीत त्यांचेवर महाराष्ट्र सहकारी कायदयानुसार  कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तालुका उपनिबंधक डॉ. ए. एस. गार्डी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            मोफा अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झाल्यावर  4 महिन्यात विकासकाने इमारतीच्या जमिनीचे संस्थेच्या नावाने हस्तांतरण करुन देणे बंधनकारक आहे. जोपर्यत इमारतीखालील जमीन गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होत नाही. तोपर्यत वाढलेला चटईक्षेत्र निर्देशांक, इमारतीची पुर्नबांधणी इत्यादीसाठी गृहनिर्माण संस्थेला विकासकावर अवलंबून रहावे लागते.
             सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मानीव अभिहंस्तांतरणाची विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले आहे.  या मोहिमे अंतर्गत संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना विकासकाकडून जमिनीचे कायदेशिर हक्क प्रदान करण्याचा शासनाचा उददेश आहे.
              आपली गृहनिर्माण संस्था तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल तर त्या ठिकाणी सदर संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांवकडे विहित नमुन्यात सादर करावा. व त्यापुढील कार्यवाही कशाप्रकारे असेल याबाबत उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव आपल्याला मार्गदर्शन करतील.
                या विशेष मोहिमेव्दारे जळगांव तालुक्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशिर हक्क विकासकाकडून प्राप्त करुन इमारत संस्थेची, जमिनीची मालकी देखील संस्थेचीच असे होण्यासाठी या विशेष मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा तसेच या संबंधातील अधिक माहिती.  http://housing.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment