Monday, 7 January 2013

सैन्यामध्ये 12 जानेवारी रोजी रिलीजियस टिचरची भरती



        जळगांव, दि. 7 :- सैन्य दलात रिलीजियस टीचर आआरटी – 71 ची सरळ भरती दिनांक 12 जानेवारी 2013 रोजी पुणे येथे होणार असून जळगांव जिल्हयातील उमेदवारांनी आपले अर्ज 12 जानेवारी 2013 पर्यंत रिक्रुटींग ऑफिसर , हेडक्वार्टर रिक्रुटींग झोन, 3 राजेंद्रसिंहजी रोड, पुणे 01 येथे पाठविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालय जळगांव यांनी केले आहे.
           सदरच्या पदाकरिता उमेदवाराचे वय 27 ते 34 वर्ष असावे तर शिक्षण पदवीधर माध्यमा संस्कृत, हिंदी अथवा प्रादेशिक भाषेत प्राविण्य असावे, तसेच बी.ए. संस्कृत / हिंदी घेऊन उत्तीर्ण असावा. या विषयी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.   

No comments:

Post a Comment