मुंबई, दि. 3 : राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन
पुरस्कार योजनेत (2011-12) सहभागी
होण्याचे आवाहन भारत सरकारच्या गृह मंत्रालय, राजभाषा विभाग यांनी केले आहे. या योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार 2 लाख रुपये
रोख, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तर द्वितीय पुरस्कार 1 लाख 25 हजार रुपये,
प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय पुरस्कार 75 हजार रुपये, प्रमाणपत्र,
स्मृतीचिन्ह असून उत्तेजनार्थ पुरस्काराची रक्कम 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व
स्मृतीचिन्ह असे आहे. 10 ऑक्टोबर 2012 पूर्वी राजभाषा विभाग, नवी दिल्ली येथे
प्रवेशिकासोबत पुस्तके तीन प्रतींमध्ये पाठविण्यात यावीत. राजभाषा विभागाचे
संकेतस्थळ http:// rajbhasha.gov.in तसेच
http:// www. rajbhasha.nic.in असे आहे.
पात्रता व अटी
अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, जैव
तंत्रज्ञान, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ शास्त्र, उदारीकरण, प्रदूषण नियंत्रक,
मानवाधिकार, जागतिकीकरण इत्यादी विषयांवर समीक्षणात्मक पुस्तके लिहिलेली असावीत. 1
एप्रिल 2011 ते 31 मार्च 2012 या कालावधीतील प्रकाशित पुस्तके स्वीकारली जातील.
भारतातील कोणताही नागरिक या पुरस्कार योजनेत सहभागी होऊ शकतो. विद्यालयांसाठी
असलेली पाठयपुस्तके, कहाणी, नाटक, शोधनिबंध या स्वरुपातील पुस्तके या योजनेसाठी
पात्र ठरणार नाहीत. 2011-12 या वर्षाच्या अगोदर तीन वर्षांमध्ये ज्या व्यक्तीस या
योजनेचा पुरस्कार मिळाला आहे. त्या व्यक्तीचे पुस्तक या वर्षासाठी विचारात घेतले
जाणार नाही. पुस्तकाची पृष्ठ संख्या किमान 100 पृष्ठे असावीत. मूल्यांकन समितीचा
निर्णय अंतिम राहील. पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या पुस्तकाचे लेखक एकापेक्षा अधिक
असल्यास पुरस्काराची रक्कम त्या व्यक्तींमध्ये विभागली जाईल. या पुरस्कारासाठी
अन्य पुरस्कारप्राप्त पुस्तके पात्र समजण्यात येणार नाहीत. या पुरस्काराच्या
घोषणेपूर्वी एखाद्या पुस्तकास अन्य पुरस्कार योजनेंतर्गत पुरस्कार जाहीर झाला
असल्यास राजभाषा विभागास लेखकाने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment