मुंबई,
दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'दिलखुलास' कार्यक्रमात ग्रामविकास
विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना
आणि ग्रामविकास विभागाच्या आधुनिक वाटचाली विषयीची
माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील देणार आहेत.
राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन
ही मुलाखत दिनांक 6, 7 आणि 8 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित
करण्यात येणार आहे. ही मुलाखत दीपक वेलणकर यांनी घेतली आहे.
दुधाळ
म्हशी, गाई व शेळयांचा
गट
पुरविणे योजना बंद
मुंबई, दि. 3 : आदिवासी विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या
लाभार्थ्यांना दुधाळ म्हशी, गाई व शेळयांचा गट पुरविणे या योजनेत पूर्वी झालेली
अनियमितता तसेच याचप्रकारची नवीन स्वरुपाची योजना कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व
मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबविण्यात येत असल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय
24 जुलै 2012 रोजी शासनाने घेतला आहे.
आदिवासी विकास विभागाने 9 ऑक्टोबर 2006 रोजी
आदिवासी उपयोजना क्षेत्रात व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या
कुटूंबांकरिता दुधाळ जनावरे व शेळयांचा गट पुरविणे ही योजना सन 2006-07 ते 2009-10
या चार वर्षात राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची मुदत संपलेली असल्याने
ही योजना सन 2011-12 या वर्षाकरिता स्थगित ठेवण्या संदर्भात शासनाने 5 सष्टेंबर
2011 रोजी निर्णय घेतला होता. या योजनेत सुधारणा करुन या योजनेला मुदतवाढ देणे,
बंद करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
No comments:
Post a Comment