Friday, 6 June 2025

सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कारात जळगाव जिल्ह्याचे दिमाखदार यश!

जळगाव, दि. ६ जून  (जिमाका वृत्तसेवा):

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २०२३–२४ या वर्षासाठी विविध सामाजिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील सात संस्थांची व एका व्यक्तीची निवड होऊन राज्य व विभागस्तरावर जिल्ह्याने दिमाखदार यश संपादन केले आहे.

या पुरस्कारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड – भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांचा समावेश आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार (संस्था):

1. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, भुसावळ

4. जळगाव जिल्हा हरिजन सेवक संघ संचलित हरिजन कन्या छात्रालय, जळगाव

कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड – भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार (संस्था):

▪️ आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन, भुसावळ

शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक (संस्था):

▪️ पवन चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव

▪️लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार (व्यक्ती):

▪️ मनोज नारायण नेटके, मु.पो. बारीवाडा, ता. चोपडा, जि. जळगाव

सामाजिक समतेच्या मूल्यांना बळकटी देणाऱ्या या संस्थांचा गौरव म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक भान आणि कार्यक्षमतेची साक्ष आहे. या पुरस्कारांमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था व व्यक्तींचे मनोबल अधिकच उंचावले आहे.

सर्व पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्तींचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागाचे योगेश पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment