Tuesday, 24 June 2025

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवन मध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन


         जळगाव दि. 24 ( जिमाका ):– भारताचे चर्चित पर्व ठरलेली आणीबाणी (Emergency) २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आली होती. यावर्षी या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, या निमित्ताने जळगावमध्ये अल्पबचत भवन मध्ये शासनातर्फे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

                 बुधवार, २५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्प बचत भवन येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

                 या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने विविध घटना/घडामोडी, -आणीबाणी विरोधी संघर्षात सहभागी झालेले विविध कार्यकर्ते/नागरिकांची छायाचित्रे समाविष्ट तसेच छायाचित्रांसोबत अनुरुप व औचित्यपूर्ण असा मजकूर, आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष व त्याचे विविध पैलू प्रभावीपणे प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहे. 

                  या प्रदर्शनामध्ये छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त व माहितीपूर्ण मजकूर, घटनाक्रम, माहितीफलक यांची मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, अभ्यासक, नागरिक यांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment