Friday, 13 June 2025

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू – विद्यार्थ्यांना मोफत सुविधा

जळगाव, दि. १३ जून (जिमाका) – महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ: https://hmas.mahait.org हे असून, दिनांक ११ जून २०२५ पासून अर्ज भरता येणार आहे.

                 जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, दिव्यांग, अनाथ इत्यादी पात्र प्रवर्गातील इयत्ता ८ वी ते कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत भोजन, निवास, दरमहा निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य, गणवेश/ड्रेसकोड रक्कम, इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

जिल्ह्यात कार्यरत असलेली शासकीय वसतिगृहे:

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव

2. मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव

3. मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, जळगाव

4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ

5. मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भुसावळ

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अमळनेर

9. मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, अमळनेर

10. मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, चाळीसगाव

11. मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, रावेर

12. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, रावेर

           विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित वसतिगृहात सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जळगाव श्री. राजेंद्र कांबळे (विशेष अधिकारी, शानिशा) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment