Friday, 13 June 2025

मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव दि. 13 जून (जिमाका वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यान्वित मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, ता. जळगाव जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह जळगाव यांनी केले आहे.
000000

मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह
रावेर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव दि. १3 जून (जिमाका वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यान्वित मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रावेर ता. रावेर, जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह रावेर यांनी केले आहे.
000000000000

कृषी विभागाच्या बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेसाठी
कलाकारांना संधी
▪️
 एक लाख रुपयांचे बक्षीस; शेवटची तारीख २५ जून २०२५
जळगाव, दि. १३ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत "बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) स्पर्धा" जाहीर करण्यात आली असून राज्यातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार, शेतकरी, लेखक, डिझायनर व उद्योजक अशा सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
या स्पर्धेमार्फत कृषी विभागाच्या दृश्य ओळखीचा भाग ठरणाऱ्या नव्या बोधचिन्ह आणि प्रेरणादायी घोषवाक्याची निवड करण्यात येणार आहे. कोणतेही प्रवेश शुल्क नसलेल्या या स्पर्धेत एकाच स्पर्धकास दोन पर्याय सादर करता येतील तसेच तो दोन्ही श्रेणींमध्ये (लोगो आणि टॅगलाईन) सहभाग घेऊ शकतो.
स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत:
बोधचिन्ह (Logo) – प्रथम पारितोषिक ₹1,00,000 तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे
घोषवाक्य (Tagline) – प्रथम पारितोषिक ₹50,000 तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:
स्पर्धकांनी आपले प्रस्ताव ई-मेलद्वारे krushipublicity@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत.
स्पर्धेची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे.
अटी, पात्रता व सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: www.krishi.maharashtra.gov.in
शंका समाधानासाठी संपर्क:
📞
 020-25537865
शासनामार्फत कृषी विभागाच्या कार्याची दृश्यरूपात प्रभावी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांची सर्जनशील कल्पकता सादर करण्याचे हे उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
00000000000

पारधी समाजातील युवक-युवतींसाठी मोफत
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यातर्फे विशेष उपक्रम
जळगाव दि. १3 जून (जिमाका वृत्तसेवा)- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्या कार्यक्षेत्रातील पारधी समाजाच्या शारीरिक व शैक्षणिक दृष्ट्या पात्र असलेल्या युवक व युवतींसाठी “आदिवासी उपयोजना क्षेत्र” अंतर्गत मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामध्ये धावणे, लांब उडी, शारीरिक क्षमता वाढविणे तसेच लेखी परीक्षेची तयारी यांचा समावेश असणार असून, शारीरिक व शैक्षणिकदृष्ट्या पात्र ५० प्रशिक्षणार्थींना निवडून १ महिन्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. (रविवारीही प्रशिक्षण सुरू राहील).
प्रशिक्षणासाठी पात्रता :
अर्जदार पारधी समाजातील असावा. किमान १२ वी उत्तीर्ण. पोलीस भरतीप्रमाणे शारीरिक निकष (उंची व छाती).
आवश्यक कागदपत्रे:
जातीचे प्रमाणपत्र (पारधी समाज), जन्म दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, ओळखपत्र (आधार/मतदार ओळखपत्र), दोन पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ जून ते ३० जून २०२५
अर्ज मिळण्याची ठिकाणे: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चोपडा रोड, यावल. संपर्क: (०२५८५) २६१४३२
2. आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह,
जामनेर (प्रविणकुमार रोकडे – ७३८५४१५९०३)
मुक्ताईनगर (एम.पी. राणे – ९४२३९७७३७२)
अमळनेर (अनिल बारेला – ९४०५६६१५८२)
चोपडा (एन. एस. खंबायत – ८२७५३१२६१९)
एरंडोल (व्ही. एम. गाढे – ७५८८४३७५२८)
पारधी समाजातील युवक व युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.
000000000000

No comments:

Post a Comment