जळगाव, दि. १३ जून (जिमाका) – महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या अधिपत्याखालील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, डेराबर्डी (चाळीसगाव) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ६ वी ते १० वी (सेमी इंग्रजी माध्यम) या वर्गांमध्ये रिक्त जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रवेशासाठी आरक्षण: अनुसूचित जाती – ८०%, अनुसूचित जमाती – १०% , विमुक्त जाती व भटक्या जमाती – ५%, दिव्यांग – २%, विशेष मागास प्रवर्ग – ३%
शाळेची वैशिष्ट्ये:
नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण
निवास, भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य विनामूल्य
सेमी इंग्रजी माध्यम व ई-लर्निंग सुविधांसह आधुनिक डिजिटल क्लासरुम
स्पर्धा परीक्षेच्या अनुभवासह प्रशिक्षित शिक्षक
अद्ययावत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय व वाचनकक्ष
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या परंपरेसह १००% निकाल
रात्र अभ्यासिका व वैयक्तिक मार्गदर्शनाची सोय
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक व संचयिका, ६ पासपोर्ट साईज फोटो
पालकाचे ओळखपत्र (आधार/मतदान/पॅन कार्ड), वैद्यकीय तपासणी अहवाल यांचा सामावेश आहे.
मुख्याध्यापक सागर विसे – ७०२१४१३९७०, गृहपाल एल. पी. कोठावदे – ९४२०६९५७९३, दिलीप परदेशी – ९९७५९१७२३३, वनिता बेरड – ७०२०४३८३२१, रूपाली सोनवणे – ९०२१९८४८९८, दिपाली तडवी – ९९२२६०८८१९, अनिता तोंडे (कनिष्ठ लिपिक) – ७७५६८४०५९६ यांच्याशी संपर्क साधून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन राजेंद्र कांबळे ( विशेष अधिकारी (शा.नि.शा.) व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment