Friday, 13 June 2025

पारधी समाजातील शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकामास अर्थसहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव दि. १3 जून (जिमाका वृत्तसेवा)- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्या मार्फत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जमातीमधील पारधी समाजातील पात्र शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकामासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.

             या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून दिनांक १६ ते ३० जून २०२५ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची पात्रता:

अर्जदार अनुसूचित जमातीतील (ST) पारधी समाजाचा असावा. वैध शेतजमीन (७/१२ उताऱ्यावर नाव व विहीर नसल्याची नोंद आवश्यक). जिल्ह्यातील रहिवासी असावा. यापूर्वी केंद्र/राज्य/जिल्हा परिषद किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा. ७/१२ उताऱ्यावर जर आधीच विहीर असल्यास लाभ मिळणार नाही. पाणी उपलब्धतेबाबतचा दाखला (मुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा) आवश्यक.

 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

जात प्रमाणपत्र (अनुसूचित जमाती – पारधी समाज), रहिवासी दाखला, ७/१२ उतारा (अद्यावत), आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज मिळण्याचे व सादर करण्याचे ठिकाण:

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आवार, चोपडा रोड,

यावल, ता. यावल, जि. जळगाव – ४२५३०१, दूरध्वनी: (०२५८५) २६१४३२

         या योजनेंतर्गत पारधी समाजातील शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment