Wednesday, 18 June 2025

शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू – २० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 18 जून (जिमाका वृत्तसेवा) :

राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठाच्या विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन २०२५-२६ करिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीच्या माध्यमातून निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक आणि हँडबॉल या खेळांमध्ये राज्यभरातील पात्र खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास व आधुनिक क्रीडा सुविधा पुरविल्या जाणार असून त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडु किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडु कि, ज्यांचे वय १९ वर्षातील आहे, अशा खेळाडुंना संबधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देवुन प्रवेश (५० टक्के प्रवेश) निश्चित केला जाणार आहे. क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडुंना ज्यांचे वय १९ वर्षातील आहे, अशा खेळाडुंना संबधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश (५०टक्के प्रवेश) निश्चित केला जाणार आहे. या चाचण्यामध्ये निवड झालेल्या खेळाडुंची वैद्यकिय पथकाव्दारे चाचणी घेवुन क्रीडा प्रबोधिनी मध्ये शारिरीक दृष्ट्या सुद्दढ खेळाडुची निवड अंतिम करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० जून २०२५ ही आहे. विभागीय कौशल्य चाचण्या २६ व २७ जून २०२५ रोजी होणार आहे. व राज्यस्तरीय सरळ ५ व ६ जुलै २०२५ या कालावधीत खेळ निहाय शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे व नागपुर येथे होईल. राज्यस्तरीय खेळनिहाय कौशल्य चाचण्याचे आयोजन दि. ७ ते ८ जुलै, २०२५ या कालावधीत खेळ निहाय शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे व नागपुर येथे होईल.
या चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खेळाडुंनी विहित नमुन्यातील अर्ज, जन्मदिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे, आधारकार्ड व जन्मदाखला) इ. माहिती विहित अर्जासह कालावधीत सादर करावी. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) - ८६२५९४६७०९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment