Wednesday, 18 June 2025

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबईदि. १८ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता  पालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि पुणे घाटसातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेअशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमीपालघर २१.१ मिमीरत्नागिरी १९.५ मिमी  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १३.६रायगड २१.७रत्नागिरी १९.५,  सिंधुदुर्ग १९.१,  पालघर २१.१नाशिक ३.१धुळे ०.३नंदुरबार ६.५अहिल्यानगर ०.४पुणे ६सोलापूर ०.२,  सातारा ८.१,  सांगली ३.२,  कोल्हापूर १३.९जालना ०.१बीड ०.२,  धाराशिव ०.२नांदेड ०.४,  परभणी ०.२हिंगोली ०.६बुलढाणा ०.१अकोला ०.२अमरावती ०.५यवतमाळ ०.२वर्धा ०.९नागपूर ०.२भंडारा १.६, गोंदिया ३.८चंद्रपूर ०.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर  जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

No comments:

Post a Comment