Tuesday, 24 June 2025

जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – विविध कंपन्यांकडून भरती


       जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हे ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे.

                     या ड्राईव्हमध्ये जैन फार्म फ्रेश फुडस.लि. शिरसोली व छब्बी इलेक्ट्रीकल्स, जळगाव या दोन नामांकित उद्योग संस्थांचा सहभाग असून, इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसह संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

                   ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी देखील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अख्तर तडवी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment