
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – वाघळी

आज
दि. 27 जून 2025 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, वाघळी येथे चाळीसगाव विधानसभा क्षेत्रात "महाराजस्व समाधान शिबिर" उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. श्री. मंगेश चव्हाण साहेब उपस्थित होते.

उद्घाटनानंतर आमदार साहेबांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन अधिकाऱ्यांना लोकाभिमुख सेवा द्यावी असे मार्गदर्शन केले.

हजारो नागरिकांना उद्देशून बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,
“समाधान शिबिरे ही फक्त सेवा वितरण नव्हे, तर शासनाने लोकांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा एक आदर्श उपक्रम आहे.”

या शिबिरात विविध विभागांनी मिळून एकूण 1776 लाभ थेट नागरिकांना वितरित केले.
No comments:
Post a Comment