जळगाव, दि. 24 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा) : सन १९७५ ते १९७७ दरम्यान देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात जळगाव जिल्ह्यातून मिसा व आयआर अंतर्गत सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान बुधवार, २५ जून २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते लढा दिलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या संदर्भातील माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोले यांनी दिली आहे. त्यांनी या सन्मान सोहळ्यास सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment