Wednesday, 18 June 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. १८ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा) :

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता मांतग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २० जुलै २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीसाठी १०वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमामध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेष्ठता व अधिक गुणांच्या आधारे निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी गुणपत्रक (मार्कशीट) शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ,पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा (पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र), जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज, कागदपत्रांच्या दोन प्रतीसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., जळगाव, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉपसमोर, हातणूर कॉलनी, जळगाव जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment