जळगाव, दि. 06 ( जिमाका ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजीचा जळगाव जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी ०२.३० वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ०३.०० वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ०३.४५ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण.
सायंकाळी. ०४.३० वाजता "आदिशक्ती मुक्ताई" पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ :- आदिशक्ती मुक्ताई मंदीर, कोथळी, मुक्ताईनगर, जि. जळगाव) सायंकाळी. ०५.३० वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी. ०६.१५ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment