जळगाव, दिनांक 01 जानेवारी (जिमाका वृत्त ) : जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, यांच्या संयुक्त विदयमाने पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्य़ात आले आहे.
सदरचा रोजगार मेळावा दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन विदयापीठतील प्रधान सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सर्वसाधारण १०वी, १२वी, सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए / एम.बी.ओ सर्व पदवीधारक असे १५०० पेक्षा जास्त रिक्तपदांबाबत विविध नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पदध्तीने कळविण्यात येणार आहेत.
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुल अप्लाय करायचे आहे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीच्या दिवशी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५ या वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्द्योजकता सहाय्यक आयुक्त श्री. संदिप गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment