Monday, 13 January 2025

राष्ट्रीय युवा दिवस" उत्साहात साजरा”





स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार युवा पीढीसाठी

प्रेरणास्तोत्र आहे : प्रविणकुमार सिंह

जळगाव, 13 जानेवारी : भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, जळगाव, नेहरू युवा केंद्र जळगाव व कवयत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय युवा दिवस" कार्यक्रमाचे आयोजन कवयत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे करण्यात आले होते.. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी क्षेत्रीय प्रबंधक, प्रविणकुमार सिंह, प्रबंधक, अभिनव, केंद्रीय संचार ब्यूरो, जळगावचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक, नितिन चौधरी, उपगटनिदेशक, चंद्रशेखर घोडके, शिक्षक, डीडी देवरे, एल पी धांड़े, शालीकराय बोरोले, महेश सूर्यवंशी, राष्ट्रीय स्वयं सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, रमेश सपकाळ, संदीप उगले, दिशा समाज बहुउउदेषीय संस्थेचे अध्यक्ष, विनोद ढगे आदी उपस्थित होते.
"स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार युवा पीढीसाठी प्रेरणास्तोत्र आहे" असे प्रतिपादन प्रविणकुमार सिंह यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे प्रेरणादायी विचार विवेकानंदानी तरुणांना दिले. आणि जो पर्यंत तुमच्याकडे ध्येय आहे तो व्यक्ती तरुण आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोद ढगे यांनी सुत्रसंचालन केले व राष्ट्रीय एकतेची गाणी गायली आणि विद्यार्थ्यां कडून म्हणून घेतली. प्रदीप पवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यालय आणि राष्ट्रीय युवा दिवसाची रूपरेषा सांगितली आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते विद्यार्थी आदित्य पाटील, विश्वजीत सोनवणे, आकांक्षा सुरवाडे, प्रथमेश सोनवणे, वैशाली मतलाने व गोविंद पवार यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महेश सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विनोद ढगे यांनी सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा सांगता झाला. यावेळी भारत माता कि जयघोषाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आवार दणाणला होता.

No comments:

Post a Comment