जळगाव, दिनांक 06 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 95 अर्ज प्राप्त झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत एकूण 32 अर्ज व जिल्हाधिकारी कार्यालयाचे 63 अर्ज असे एकूण 95 अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी संबिधित विभागाचे अधिकारी तसेच उमा ढेकळे, तहसिलदार संजय गांधी तसेच महसुल तहसिलदार ज्योती गुंजाळ इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment