राज्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलमध्ये
राईट टू गिव्ह निवडण्याचे आवाहन
जळगाव, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगाव जिल्हयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनूसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्याथ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले असून महाडीबीटी पोर्टलमध्ये राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या अर्जदारांना या पर्यायाबाबत पुन्हा निवड करू देण्याची तरतूद, संस्थेच्या 'प्रिन्सिपल लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. संबंधित अर्जदारांनी राइट टू गिव्ह अप पर्यायांबाबत पुन्हा निवड करण्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या अर्जासंदर्भात पुन्हा निवड करू देण्याची तरतूद ३० जून, २०२४ पर्यंत संस्थेच्या principal लॉगिनमध्ये उपलब्ध असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अरुण पवार यानी आहे.
00 00 00 00 00
No comments:
Post a Comment