ग्राहक चळवळ
शोषणमुक्तीसाठी
ग्राहक कल्याण
सल्लागार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी यांचे प्रतिपादन
जळगाव,
दि. 9- ग्राहक हितांच्या
रक्षणासाठी शासन, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असणे आवश्यक आहे.
उत्पादनात वाढ, उपभोगावर संयम आणि वितरणात समानता हे ग्राहक चळवळीचे उद्दीष्ट्य
आहे. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी
ग्राहक चळवळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक कल्याण
सल्लागार समितीचे अध्यक्ष(मंत्रीस्तरीय) सुर्यकांत गवळी यांनी आज येथे केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत
भवन येथे आयोजित बैठकीस ते संबोधित करीत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पुरवठा
अधिकारी विकास गजरे, प्रांताधिकारी अभिजीत
भांडे, भूसावळचे प्रांताधिकारी विजय
भांगरे, तहसिलदार गोविंद शिंदे आदी
मान्यवर तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी श्री. गवळी यांचे जिल्हा
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत
केले.
यावेळी बोलतांना श्री. गवळी यांनी ग्राहक
चळवळीचा इतिहास सांगुन देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकाचे असणारे महत्त्व विषद
केले. आपल्या दौ-यामागील भूमिका स्पष्ट करुन ते म्हणाले की, ग्राहक संरक्षण हा
विभाग अन्न नागरी पुरवठा या विभागापासून स्वतंत्र करण्यात यावा, राज्यशासनाने आपले
ग्राहक धोरण जाहीर करावे, या विभागासाठी स्वतंत्र सचिव नेमण्यात यावे, ग्राहक सेवा पुरस्कार जाहीर करावेत, तसेच
ग्राहक जनजागृतीवर भर देण्यात यावा यासाठी त्यांचे प्रयत्न असून त्यासाठी
राज्यभरातील दौ-यातून मिळालेल्या सुचना अभिप्राय ते शासनाला कळविणार आहेत. उपस्थित अधिका-यांनी मांडलेल्या सुचनाही
त्यांनी ऎकून घेतल्या. यावेळी उपस्थितांना ग्राहक संरक्षण प्रतिज्ञा देण्यात आली.
तसेच ग्राहक गीतही त्यांनी गायले. आभारप्रदर्शन तहसिलदार गोविंद शिंदे यांनी केले.
ग्राहक संघटनासमवेत बैठकः- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन
येथे महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष(मंत्रीस्तरीय)
सुर्यकांत गवळी यांनी दुपारी अडीच वाजता जिल्ह्यातील विविध ग्राहक संघटनांच्या
प्रतिनिधींची व शासकीय अधिका-यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ग्राहक
संघटना प्रतिनिधींचे मनोगत जाणून घेऊन
सा-यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध
संघटनांचे प्रतिनिधी , जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे व अन्य विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment