ध्वजदिन
निधीसाठी योगदान हे प्रत्येकाचे कर्तव्य
ध्वजदिन
निधी संकलन शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी अग्रवाल यांचे प्रतिपादन
जळगाव, दि. 16- देशासाठी आपले तारुण्य आणि प्राणाची आहुती
देणा-या सैनिकांच्या आणि
त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरल्या जाणा-या ध्वजदिन निधीत योगदान देणे हे प्रत्येकाचे
कर्तव्य आहे, आणि प्रत्येकाने
ते कृतज्ञ भावनेने पार पाडावे,असे आवाहन
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज केले.
सशस्त्रसेना
ध्वजदिन निधी संकलन 2014 चा शुभारंभ आज
जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात
आला. यानिमित्त अल्पबचत भवन
येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या
कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी.
नेमाने, अपर पोलीस
अधीक्षक नंदकुमार ठाकूर, 18 महाराष्ट्र
बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर चंद्रसेन
कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जिल्ह्यातील शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिका-यांनी ध्वजदिन निधीत आपले योगदान देऊन या निधी संकलनाचा
प्रारंभ करण्यात आला. यावेळी सभागृहात
उपस्थित सर्व मान्यवरांनी निधीसाठी आपले योगदान दिले.
प्रास्ताविकात
मेजर कुलथे यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा 2013
चा
इष्टांक जिल्ह्याने पुर्ण केला असल्याची माहिती दिली. तसेच
या निधीचा उपयोग माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणा-या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केला जातो, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या की, ध्वजदिन निधी हा सैनिकांबद्दल आपली कृतज्ञता
व्यक्त करण्याची संधी आहे. हा निधी
सैनिकांच्या कल्याणासाठी संकलित करुन माननीय राज्यपालांच्या नावे जमा होतो. हा निधी कसा उपयुक्त आहे, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविल्यास योगदान
नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा
त्यानी व्यक्त केली व आगामी वर्षासाठी निधी संकलनासाठी शासनाच्या सर्व विभागांना
आवाहन केले. पोलीस अधिक्षक डा. सुपेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त
केले.
या प्रसंगी
उपस्थित वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता त्यांचा सत्कार जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संकलित निधीतून सैनिकांच्या मुलामुलींना
शिष्यवृत्ती तसेच कुटूंबियांना इतर लाभांचे धनादेश देण्यात आले. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2013 मध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या शासकीय विभागाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास
कर्मल पी.आर.सिंह,
कमांडर
श्रीधर मोरे, मेजर यशवंत लिमये, कॅप्टन मोहन कुलकर्णी, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व सैनिकांचे पाल्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन
किशोरी वाघुळदे यांनी केले. यावेळी निवृत्ती
वेतनातून ध्वजदिन निधीसाठी 11 हजार रुपयांची
देणगी देणा-या पेन्शनर्स
असोसिएशनचे जे.जे.साळी यांचाही
सत्कार करण्यात आला.
वीरमाता,
वीरपत्नींचा हृद्य सत्कार
या कार्यक्रमात वीरमाता
साकरबाई धनाजी ठाकरे,इंदूबाई पुंडलिक
पाटील, लक्ष्मीबाई भिवसन पाटील, अनुसयाबाई
काशिनाथ शिंदे, तुळसाबाई रोहिदास
बागुल, चंद्रकला आनंदा जाधव, शैला अनंतराव
साळूंखे, निर्मला सुवालाल हनुवते, कल्पना विलास
पवार, सरला भानुदास बेडिस्कर, सुनंदा वसंत उबाळे, सुरेखा पोपट पाटील, कविता राजू साळवे, कल्पना देविदास पाटील, सुनंदा मनोहर पाटील, रंजना अविनाश
पाटील, वीरपिता रमेश देवराम पवार
यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कल्पना देविदास पाटील
यांनी घरकुलासाठी आर्थिक मदत तर पूजा संजय महाजन, स्नेहा राजेंद्र कासार, राजेश्वरी सोनवणे, प्रियंका भदाणे, आश्विनी पाटील, विजया सतिश कदम,
निकिता
माळी, आकाश शिंदे, अमोल बडगुजर, ऋषभ पाटील,
कृष्ण
राजेंद्र मराठे, मिनाक्षी रघुनाथ
माळी, वृषाली अनिल पाटील या
सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती लाभाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
00000
No comments:
Post a Comment