चाळीसगावात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
चाळीसगांव,दिनांक 22:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने
बुधवार दिनांक 24 डिसेंबर, 2014 रोजी तालुका
प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक
पंचायतीचे अध्यक्ष बाबासाहेब चंद्रात्रे यांच्या अध्यक्षतेखाली जयहिंद माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे रोड चाळीसगांव येथे सकाळी 10:30 वाजता आमदार उन्मेश
पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत
महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्राहकांचे प्रबोधन होण्याच्या दृष्टीकोनातून सदर
कार्यक्रमात विकास महाजन यांचे व्याख्यान, चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा
पुरवठा अधिकारी विकास गजरे, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, उपविभागीय अधिकारी मनोज
घोडे पाटील, तालुका व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, पंचायत समिती सभापती आशालता
साळुंखे, महात्मा फुले सामा. व शैक्षणीक विकास मंडळाचे चेअरमन अशोक हरी खलाणे हे
उपस्थित राहणार आहेत.
तरी आयोजित कार्यक्रमातील व्याख्यान,
चर्चासत्र व प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असे आवाहन तहसिलदार
बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment