Sunday, 7 December 2014

एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन रोजगाराचे मोठे दालन उभारणार ! आमदार उन्मेश पाटील


एम.आय.डी.सी.च्या माध्यमातुन
रोजगाराचे मोठे दालन उभारणार !
: आमदार उन्मेश पाटील

            चाळीसगांव,दिनांक 07:-  चाळीसगांव तालुक्यातील बेरोजगारांसाठी एम.आय.डी.सी. च्या माध्यमातुन रोजगाराचे मोठे दालन उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी एम.आ.डी.सी. अंतर्गत रस्ते भुमीपुजनाच्या वेळी केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार ए.टी.पाटील, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, माजी आमदार साहेबराव घोडे, सतिष पाटे, शेषराव पाटील, राजेंद्र चौधरी, प्रभाकर चौधरी, संजय घोडे, सरदार शेठ, दिनेश बोरसे, एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता झांजे, उप अभियंता नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
            256 हेक्टर क्षेत्रात वसलेल्या एम.आय.डी.सी. मधील सुमारे 6.25 कोटी खर्चाच्या अंतर्गत रस्ते विकासासोबत उद्योजकांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबध्द् आहे. उद्योगवाढीला चालना मिळण्याकामी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी 22 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच ती कार्यान्वीत होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात सुमारे 268 पथदिवे बसविण्याची कार्यवाही देखील कार्यकारी अभियंता म.औ.वि.म. औरगांबाद यांचेकडून करण्यात येत असल्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले.  चाळीसगांव तालुक्यातुन स्थलांतरीत होणारे उद्योजक, कामगार यांना विनातारण कर्जाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असून कुशल कामगार घडविण्यासाठी येत्या 27 तारखेला उद्योगव्यवसाय संबंधीच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            कॉटन क्लस्टर उभारण्यासाठी केंद्रशासनामार्फत विविध योजना कार्यान्वित असून त्याचा लाभ तालुक्यातील उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन खासदार ए.टी.पाटील यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन केले. चाळीसगांव शहर हे मध्य रेल्वे मार्गावर येत असले तरी चाळीसगांव ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून या रेल्वे मार्गामुळे उद्योगवाढीला नक्कीच चालना मिळेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे यांनी मनोगत व्यक्त केले तर एम.आय.डी.सी.चे आनंदकर यांनी कामाची माहिती विषद करुन सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जितेंद्र वाघ यांनी केले.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment