राष्ट्रीय
लोकअदालत 13 डिसेंबर रोजी
जळगाव,
दि. 8- वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक
चणचण, वेळेचा अपव्यय याबाबी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,
मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे दिनांक 13 डिसेंबर 2014 रोजी राष्ट्रीय
लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
जळगावचे सचिव रा.म.मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री. मिश्रा
यांनी माहिती दिली की, दि. 13 डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.
एस.बी. अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
त्यासाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, मुख्य कार्यकारी
अधिकारी, जि.प. जळगाव, आयुक्त महानगरपालिका जळगाव आदींचे सहकार्य लाभणार आहे.
या लोकअदालतीत भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार
अपघात खटले, म्युनिसिपल अपिल, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर
खटले, तसेच सेंट्रल बॅंक आफ इंडीया, भारत संचार निगम लि., आयडीया सेल्युलर, इंडसईंड
बॅंक, बॅंक ऑफ बडॊदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र,
युको बॅंक, आदींचे खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते
असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय,
सहा. धर्मदाय आयुक्त, ग्राहक मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या त्या
न्यायालयांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. या लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील 400
न्यायालयीन कर्मचारी, 55 न्यायिक अधिकारी, 100 पॅनलवरील विधीज्ञ, 250 पोलीस
कर्मचारी, भूसंपादन अधिकारी, आदी उपस्थित राहतील. यानिमित्ताने जिल्हा
न्यायालयाच्या आवारात होणारी गर्दी पाहता पार्किंगची व्यवस्था जी.एस. मैदानावर
करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत आपली
प्रकरणे दाखल करावित व न्यायविलंब टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
* * * * * * *
कैद्यांच्या आहारासाठी निविदा मागविल्या
जळगाव, दि. 8 :- भडगाव दुय्यम कारागृह वर्ग 2 येथील
कैद्यांना दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
2015 या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी
दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाणी पुरविण्याचा मक्ता द्यावयाचा आहे. त्याकरिता
सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा दिनांक 30 डिसेंबर 2014 रोजी
दुपारी तीन वाजे पावेतो (सुटीचे दिवस सोडून) तहसिल कार्यालय भडगाव येथे टपालाने
अगर समक्ष पाठवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या निवीदांचा विचार केला जाणार नाही, असे
दुय्यम कारागृह अधिक्षक भडगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *
सेवापुस्तक
पडताळणी
जळगाव, दि. 8 :- वेतन पडताळणी पथक नाशिक
कार्यालयातील पथकाने ऑक्टोंबर 2014 पर्यंत सादर केलेली सेवापुस्तके पडताळून
निष्कर्ष नोंदविलेले आहेत. मात्र काही कार्यालयांची सदरची पुस्तके अदयापही नाशिक
कार्यालयातच आहेत. अशा कार्यालयांनी त्यांची सेवापुस्तके प्राधिकार पत्रासह
प्रतिनिधी पाठवून प्राप्त व्यवस्था करावी. ज्या कार्यालयांनी त्यांचे आस्थापनेवरील
अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तकांची पडताळणी करुन घेतलेली नाही. अशा कार्यालयांनी त्वरीत संबंधितांची वेतन पडताळणी
करुन घ्यावी , असे बाळासाहेब घोरपडे सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक
यांनी कळविले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment