जळगाव येथे
राष्ट्रीय लोक अदालतीत 5हजार 811 प्रकरणांचा निपटारा
जळगाव,
दि. 13- येथे आयोजित
राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 5 हजार 811 प्रकरणांचा
निपटारा करुन तडजोड करण्यात आली.
वर्षानुवर्ष
प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव
तर्फे आज
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. आज सकाळपासून जिल्हा
न्यायालयाच्या आवारात व जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा उपक्रम राबविण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात तब्बल 11 हजाराहून अधिक प्रकरणे जिल्हा न्यायालयात तडजोडीसाठी
दाखल करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा
व सत्र न्यायाधिश श्री. एस.बी. अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली तब्बल 48 पॅनेल्ससमोर
प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले.
त्यात तब्बल 5 हजार
811 प्रकरणांचा निपटारा आज दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आला. यात न्यायालयीन
2066 , संलग्न न्यायाधिकरणांचे 298
दाखलपुर्व प्रकरणे 2231, विशेष मोहिमेद्वारे निपटारा करण्यात आलेले 1216
असे तब्बल 5हजार 811 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या सर्व प्रकरणांच्या सुमारे
11 कोटी रुपयांची तडजोड झाल्याची माहिती जिल्हा न्यायालय सूत्रांनी दिली.
लोकअदालतीनिमित्त
आज सकाळपासूनच जिल्हा न्यायालयात पक्षकारांची गर्दी दिसून आली. औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय,
सहा. धर्मदाय आयुक्त, ग्राहक मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणांवरही त्या त्या
न्यायालयात सुनावणी होऊन 298 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. या लोक अदालतीसाठी
जिल्ह्यातील 400 न्यायालयीन कर्मचारी, 55 न्यायिक अधिकारी, 100 पॅनलवरील विधीज्ञ,
250 पोलीस कर्मचारी, भूसंपादन अधिकारी, आदी मोठ्या संख्येने कार्यरत होते.
या लोकअदालतीत
भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपिल,
दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले, तसेच सेंट्रल बॅंक ऑफ
इंडीया, भारत संचार निगम लि., आयडीया सेल्युलर, इंडसईंड बॅंक, बॅंक ऑफ बडॊदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, युको बॅंक, आदींचे खटला
दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या
खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी
ठेवण्यात आले होते.
No comments:
Post a Comment